टी-20 वर्ल्डकप नंतर भारतीय संघाला दोन मोठे धक्के ; आलं ‘हे’ मोठं कारण समोर

 भारतीय क्रिकेट बोर्डानं ही मालिका स्थगित केली आहे. कोरोना महामारीच्या भीतीमुळे हा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजलं जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे न्यूझीलंड दौरा रद्द करण्यात आला असून हा दौरा  टी-20 वर्ल्डकप नंतर होणार आहे. पण, कोरोना व्हायरसमुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं ही मालिका रद्द केली आहे. 

  क्रिकेट क्षेत्रामध्ये भारतीय संघाला टी-20 वर्ल्डकप नंतर दोन मोठे धक्के बसणार असणार आहेत. पहिलं म्हणजे भारतीय संघाचा आगामी न्यूझीलंड दौरा रद्द करण्यात आला आहे. आणि दुसरं म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री टी-20 वर्ल्डकप नंतर राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. टी-20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा होता. परंतु पुढील वर्षापर्यंत हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

  कोरोना महामारीच्या भीतीमुळे हा दौरा स्थगित करण्याचा निर्णय

  भारतीय क्रिकेट बोर्डानं ही मालिका स्थगित केली आहे. कोरोना महामारीच्या भीतीमुळे हा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजलं जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे न्यूझीलंड दौरा रद्द करण्यात आला असून हा दौरा  टी-20 वर्ल्डकप नंतर होणार आहे. पण, कोरोना व्हायरसमुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं ही मालिका रद्द केली आहे.

  सध्या आयपीएलची रणधुमाळी पहायला मिळत आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचं दुसरं पर्व सुरु होत असून सगळीकडे जल्लोषाचं वातावरण पहायला मिळत आहे. याशिवाय यंदा प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये एण्ट्री करता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

  भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री टी-20 वर्ल्डकप नंतर राजीनामा देणार

  भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री टी-20 वर्ल्डकप नंतर राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर टीमसोबत रवी शास्त्रीसहित अन्य कोचिंग स्टाफ देखील नसणार असल्याचं सांगितलं जात आहे. टी-20 वर्ल्डकप नंतर शास्त्री यांचा करार संपणार आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) च्या साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत करार वाढवण्याच्या प्रस्तावाला नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर यावेळी टीम इंडियासोबत नवीन प्रशिक्षक असणार आहेत.