विराटने कर्णधारपदाला ठोकला रामराम, रोहित शर्मानंतर अजून दोन खेळाडूंची नावं चर्चेत

विराट कोहली ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामनामध्ये तो कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. कोहलीने कर्णाधारपदाचा मोेठा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का बसला. कारण टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री सुद्धा टी-२० वर्ल्डकपनंतर राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने काल (गुरूवार) टी-२० वर्ल्डकपनंतर राजीनामा देणार असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर टीम इंडियाला एक मोठा धक्काच बसला. विराटने राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाची कमान आता कोणाची हाती जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु कोहलीनंतर रोहित शर्माचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं. मात्र, रोहितनंतर अजून टीम इंडियाच्या दोन खेळाडूंची नावे चर्चेत आली आहेत.

    विराट कोहली ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामनामध्ये तो कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. कोहलीने कर्णाधारपदाचा मोेठा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का बसला. कारण टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री सुद्धा टी-२० वर्ल्डकपनंतर राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    एका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली उपकर्णधारपदावरून सलामीवीर रोहित शर्माला पायचीत करणार होता. विराट लिमिडेट ओव्हर्समध्ये रोहितला उपकर्णधार पदावरून पायउतार करण्यासाठी निवडकांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यामध्ये टीम इंडियाच्या कर्णधाराचं असं म्हणणं होतं की, रोहित आता ३४ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत के.एल राहुल आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये ऋषभ पंतला उपकर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी दिली पाहीजेत. परंतु या प्रस्तावाला बोर्डकडून नापसंती दर्शवण्यात आली.

    विराट आणि रोहित एकमेकांशी बोलत नसल्याच्या बातम्या समोर

    २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, विराट आणि रोहित एकमेकांशी बोलत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सर्व गोष्टींना नकार दिला. एवढेच नाही तर रोहितने सोशल मीडियावर विराटला अनफॉलो केल्याची एक बातमीही समोर आली.