टीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट?

टीम इंडियाचे क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौथम (K Gowtham) यांना कोरोनाची लागण (tested positive for Covid-19 ) झाली आहे. याआधी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला (Krunal Pandya) कोरोना झाला आहे.

    श्रीलंका दौऱ्यावर असेलेले टीम इंडियाचे क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौथम (K Gowtham) यांना कोरोनाची लागण (tested positive for Covid-19 ) झाली आहे. याआधी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला (Krunal Pandya) कोरोना झाला आहे. त्यानंतर कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळांडूना क्वारंटाइन करण्यात आले होते. तसेच दुसरा सामनाही स्थगित करण्यात आला होता.

    शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडियाने श्रीलंका दौर्‍यावर मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या. काल गुरुवारी झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात टीम इंडिया ७ गडी राखून पराभूत झाला. अशा प्रकारे श्रीलंकेने ही टी-२० मालिका २-१ने जिंकली.

    दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू मालकेबाहेर गेले. आता यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम पॉझिटिव्ह आढळले आहेत. नवीन चाचणीनंतर हो दोघे पॉझिटिव्ह आढळले आहेत.

    श्रीलंका सरकारच्या प्रोटोकॉलनुसार, जो खेळाडू पॉझिटिव्ह येईल त्याला १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. यानंतर, ते निगेटिव्ह  चाचणीनंतरच देश सोडू शकतात. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला ७ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागते.

    टीम इंडिया आज श्रीलंकेहून घरी परतणार आहे.  हार्दिक, पृथ्वी, सूर्यकुमार, मनीष, दीपक चहर आणि इशान किशन या खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ते संघासह भारतात परततील.