भल्याभल्या फलंदाजांची दांडी ‘गुल’ करणारा गोलंदाज उमर गुल निवृत्त

पाकिस्तानचा (Pakistan Player) वेगवान गोलंदाज उमर गुलने (Umar Gul) तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International Cricket) अलविदा केले आहे. शनिवारी नॅशनल कप टी-२० (T-20) स्पर्धेच्या समारोपानंतर गुल निवृत्त झाला. गुल पुढील कारकीर्द प्रशिक्षणात घालवण्यासाठी इच्छुक आहे. गुलने पाकिस्तानकडून ४७ कसोटी, १३० एकदिवसीय तर ६० टी-२० सामने खेळले आहेत.

कराची : पाकिस्तानचा (Pakistan Player) वेगवान गोलंदाज उमर गुलने (Umar Gul) तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International Cricket) अलविदा केले आहे. शनिवारी नॅशनल कप टी-२० (T-20) स्पर्धेच्या समारोपानंतर गुल निवृत्त झाला. गुल पुढील कारकीर्द प्रशिक्षणात घालवण्यासाठी इच्छुक आहे. गुलने पाकिस्तानकडून ४७ कसोटी, १३० एकदिवसीय तर ६० टी-२० सामने खेळले आहेत. पाकिस्तान संघाने टी-२० विश्वकरंडक जिंकला होता. त्या विजयात गुलने मोलाचे योगदान होते. शुक्रवारी रावळपिंडी येथे दक्षिण पंजाबकडून पराभूत झाल्यानंतर गुलचा संघ उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर पडला. जड अंत:करणाने नॅशनल कप टी-२० स्पर्धेनंतर मी क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमध्ये निवृत्तीचा विचार केला आहे. मी नेहमीच पाकिस्तानकडून जोशाने खेळलो आहे.

४०० हून अधिक बळी टिपले

उमर गुलने २००३ ते २०१६ या काळात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. गुलने कसोटीत १६३, एकदिवसीयमध्ये १७९ तर टी-२० मध्ये ८५ गडी बाद केले आहेत. याशिवाय गुल आयपीएलमध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात कोलकाता नाईच रायडर्स संघाकडून खेळला आहे. उमर गुलने कसोटीचा शेवटचा सामना २०१३ मध्ये खेळला होता. याशिवाय तो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अखेरचा सामना २०१६ मध्ये खेळला. तिन्ही प्रकारात ४०० हून अधिक गडी बाद केले आहेत.