दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचं सिडनीमधील राहत्या घरातून अपहरण, पोलिसांच्या छापेमारीत ४ जणांना अटक ; नक्की काय आहे प्रकरण?

मॅकगिल यांना घरातून काही जणांनी अपहरण केलं आणि त्याला जबरदस्तीनं कारमध्ये बसवून दक्षिण पश्चिम ऑस्ट्रेलियातील एका शहरात नेण्यात आले. त्यानंतर त्याचे ठिकाण बदलण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन सुटका केली. मॅकगिलच्या अपहरणाची बातमी २० एप्रिल रोजी सार्वजनिक झाली, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिली आहे

    सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल (Stuart Macgill) याच्या अपहराणाप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. मॅकगिलचं सिडनीमधील राहत्या घरातून मागच्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं. खंडणीच्या प्रकरणातून १४ एप्रिल रोजी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.

    या प्रकरणात मिळालेल्या महितीनुसार, मॅकगिल यांना घरातून काही जणांनी अपहरण केलं आणि त्याला जबरदस्तीनं कारमध्ये बसवून दक्षिण पश्चिम ऑस्ट्रेलियातील एका शहरात नेण्यात आले. त्यानंतर त्याचे ठिकाण बदलण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन सुटका केली. मॅकगिलच्या अपहरणाची बातमी २० एप्रिल रोजी सार्वजनिक झाली, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिली आहे.

    यानंतर सिडनी पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारी केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. या सर्वांची नावं अजून जाहीर करण्यात आलेली नाहीत. या सर्वांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.