Violation of anti-doping rules; Wrestler Sumit Malik banned for 2 years

टोक्यो ऑलिम्पिक आधीच भारताच्या आशांना शुक्रवारी मोठा धक्का बसला. कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्याच्यावर बंदी घातलेला पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप आहे. अँटी डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (यूडब्ल्यूडब्ल्यू) या कुस्तीपटूवर 2 वर्षांची बंदी घातली आहे.

    दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक आधीच भारताच्या आशांना शुक्रवारी मोठा धक्का बसला. कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्याच्यावर बंदी घातलेला पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप आहे. अँटी डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (यूडब्ल्यूडब्ल्यू) या कुस्तीपटूवर 2 वर्षांची बंदी घातली आहे. त्याचा ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याच्या ‘ब’ नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ आढळून आले आहेत. या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यासाठी किंवा तो मान्य करण्यासाठी मलिकला एका आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे.

    याआधी झाला होता निलंबित

    सुमित मलिक बल्गेरियात झालेल्या पात्रता स्पर्धेत डोपिंगमध्ये अपयशी ठरताच त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्ण विजेता सुमित बल्गेरियात 125 किलो वजन गटात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता.

    30 जून रोजी घेण्यात आलेल्या त्याच्या ‘ब’ नमुन्याच्या चाचणीत बंदी घातलेल्या पदार्थाचे अंश सापडले आहेत. त्याच्या उजव्या गुडघाच्या दुखण्यामुळे त्याने वेदनाशामक औषध घेतल्याचे मलिकने सांगितले. यूडब्ल्यूडब्ल्यू ने 3 जूनपासून लावलेल्या 2 वर्षांच्या बंदीची भारतीय कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे.