विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, सौरव गांगुलीचा तोडला रेकॉर्ड; टी-२० सामन्यात भारतीय संघाचा मोठा पराभव

रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन नवी सलामीची जोडी मैदानावर उतरवण्याचा विराट कोहलीचा ( Virat Kohli) डाव फसला. शिखर धवन, लोकेश राहुल व विराट कोहली हे तिघेही फलकावर २० धावा असताना माघारी परतले.

    भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला टी-२० सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन नवी सलामीची जोडी मैदानावर उतरवण्याचा विराट कोहलीचा ( Virat Kohli) डाव फसला. शिखर धवन, लोकेश राहुल व विराट कोहली हे तिघेही फलकावर २० धावा असताना माघारी परतले.

    विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम

    विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ४७५ इनिंगमध्ये सलग दोन वेळा शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांत विराटनं चौथं स्थान पटकावलं. सचिन तेंडुलकर ( ३४), वीरेंद्र सेहवाग ( ३१), सौरव गांगुली २९, विराट ( २८) आणि युवराज सिंग ( २६) असे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांत विराटनं सौरव गांगुलीला मागे टाकले. विराट १४ वेळा, तर गांगुली १३ वेळा कर्णधार म्हणून शून्यावर बाद झाला आहे.