चौथ्या कसोटी सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता, विराट कोहलीने नाकारला दिग्गजांचा सल्ला

लीड्स टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने चांगली सुरूवात केली होेती. परंतु इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीमुळे टीम इंडियाचा धुराळा उडाला. कोहलीने सांगितलं की, एका अतिरिक्त फलंदाजी खेळाडूला निवडणे हे माझा संतुलन नाहीये आणि मी यावर कधीही विश्वास ठेवत नाही. एक तर तुम्ही प्रयत्न करू शकता आणि स्वत:ला हारण्यापासून वाचवू शकता.

    नवी दिल्ली –  टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा धुव्वा उडवत तिसरी कसोटी खिशात घातली आहे. तसेच इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली आहे. परंतु टीम इंडियाच्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता चौथ्या कसोटी सामन्यामध्ये मोठे बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विराट कोहलीने दिग्गजांचा सल्ला घेण्यासाठी नाकारलं असल्याची माहिती मिळाली आहे.

    लीड्स टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने चांगली सुरूवात केली होेती. परंतु इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीमुळे टीम इंडियाचा धुराळा उडाला. कोहलीने सांगितलं की, एका अतिरिक्त फलंदाजी खेळाडूला निवडणे हे माझा संतुलन नाहीये आणि मी यावर कधीही विश्वास ठेवत नाही. एक तर तुम्ही प्रयत्न करू शकता आणि स्वत:ला हारण्यापासून वाचवू शकता. त्यामुळे तुम्ही तुमचा खेळ जिंकू शकता. आम्ही पूर्वीही तितक्याच फलंदाजांसह सामने ड्रॉ केले आहेत.

    चौथ्या कसोटी सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता

    पुढे विराटने सांगितलं की, वर्कलोड सांभाळाव लागणार आहे. त्यामुळे आघाडीच्या गोलंदाजांनी सलग चार कसोटी सामने खेळावेत अशी आमची इच्छा नाही. आमचे लोकांशी हे संभाषण होईल आणि तुम्ही एवढ्या छोट्या बदलामध्ये हे लोक सलग चार कसोटी सामने खेळतील अशी अपेक्षा करू शकत नाही. असं कोहलीने सांगितलं आहे.