बॉक्सिंग डे टेस्टमधल्या भारताच्या कामगिरीवर विराट कोहलीने सांगितलं असं काही…

विराटऐवजी (Virat) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. ऑस्ट्रेलियाने (Aus) प्रथम नाणेफेक (Won The Toss) जिंकून फलंदाजी (Batting) करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु भारताचे सुपरहिट गोलंदाज बुमराह, अश्विन आणि सिराजने घातक गोलंदाजी करत १९५ धावांपर्यंत थांबा दिला आहे.

मेलबर्न : बॉक्सिंग डे टेस्टमधल्या भारताच्या (India vs Australia) उत्कृष्ट कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीने कौतुक केलं आहे. विराट कोहली (Virat Kohli Appreciation Of  Team India) पितृत्वाच्या रजेसाठी हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. तसेच विराटऐवजी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. ऑस्ट्रेलियाने (Aus) प्रथम नाणेफेक (Won The Toss) जिंकून फलंदाजी (Batting) करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु भारताचे सुपरहिट गोलंदाज बुमराह, अश्विन आणि सिराजने घातक गोलंदाजी करत १९५ धावांपर्यंत थांबा दिला आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने ट्विट करून टीम इंडियाचं कौतुक केलं. पहिल्या दिवशी आम्ही टॉपवर राहिलो. बॉलर्सनी शानदार कामगिरी करत ठोस अंत केला, असं विराट म्हणाला.

गोलंदाजांनी केली कमाल

सामन्याच्या पाचव्या ओव्हरलाच जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या जो बर्न्सला शून्य धावांवर माघारी धाडलं. यानंतर अश्विनने मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांची विकेट घेतली. बुमराहला सर्वाधिक ४विकेट, तर अश्विनला ३, मोहम्मद सिराजला २ आणि रविंद्र जडेजाला १ विकेट मिळाली. दरम्यान, पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतण्याआधी विराट कोहलीने भारतीय टीमला खास संदेश देऊन टीमचं प्रोत्साहन वाढवलं होतं.