Virat Kohli's Alishan car fell out of the police station, ate dust and was confiscated

विराट कोहलीने वापरलेली गाडी ही एका एजंटच्या माध्यमातून विकण्यात आली होती. विराटनंतर त्या गाडीचा मालक सागर ठक्कर हा होता. परंतु सागर ठक्करवर गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे कारवाईमध्ये पोलिसांनी त्याच्या गाडीवर जप्ती आणली होती.

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) खरेदी केलेली अलिशान ऑडी कार (Expensive Audi Car) आता एका पोलीस स्थानकाच्या बाहेर धूळ खात पडली आहे. ही ऑडी कार विराट कोहलीने वापरलेली आहे. परंतु आता ती अलीशान गाडीची वाईट अवस्था झाली आहे. ही गाडी एका पोलीस स्थानकाच्या (police station) बाहेर गंजून पडल्याची दिसते आहे. विराट कोहलीला महागड्या गाड्य चालवण्याचा शौक आहे. त्याच्याकडील गाड्यांच्या ताफ्यात अनेक महागड्या किंमतीच्या गाड्या आहेत.

विराट कोहलीने वापरलेली गाडी ही एका एजंटच्या माध्यमातून विकण्यात आली होती. विराटनंतर त्या गाडीचा मालक सागर ठक्कर हा होता. परंतु सागर ठक्करवर गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे कारवाईमध्ये पोलिसांनी त्याच्या गाडीवर जप्ती आणली होती. विराटने ही ऑडी आर८ ही कार २०१२ मध्ये विकली होती. त्या गाडीचा नवा मालक एका घोटाळ्यात अडकला होता. सागर ठक्करने ही कार त्याच्या प्रेयसीला भेट देण्यासाठी खरेदी केली होती. परंतु पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याला अटक केली आणि गाडीवर जप्ती आणली.

विराट कोहली आता ऑडी इंडियाचा ब्रँड अम्बेसेडेर आहे. त्यामुळे एखादी नवी गाडी बाजारात आली की त्या गाडीवर विराट आपला हात साफ करुन घेतो. विराटला अलिशान गाड्या चालवण्याची प्रचंड आवड आहे.