टी-20 च्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विटरवरून दिली धक्कादायक माहिती…

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आपलं कर्णधार पद सोडणार असल्याची चर्चा रंगत होती. परंतु या चर्चेला आता फुलस्टॉप लागला आहे.

    टी-20 वर्ल्डकप तोंडावर असताना क्रिकेट विश्वामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आपलं कर्णधार पद सोडणार असल्याची चर्चा रंगत होती. परंतु या चर्चेला आता फुलस्टॉप लागला आहे. कर्णधार विराट कोहली टी-20 च्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. कोहलीने कर्णधारपदाचा मोठा निर्णय घेतला असून ट्विटरवर त्याने ट्विट देखील केलं आहे.