बॅट्समन को भी टाईम नही मिला ढंग से और.., विरेंद्र सेहवागची टीम इंडिया आणि आयसीसीवर कडाडून टीका

वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्याने पहिल्या डावांत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा समाचार घेतला आहे आणि याच ट्विटमधून त्याने आयसीसीवरही टीका केली आहे. बॅट्समन को भी टाईम नही मिला ढंग से…. और आयसीसी को भी…!, असं ट्विट करत त्याने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

    मुंबई : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून खराब वातावरण असल्यामुळे पूर्ण ओव्हर्स खेळवल्या गेल्या नाहीत. आज सामन्याचा पाचवा दिवस आहे. परंतु वातावरण अद्यापही ढगाळ दिसत आहे. सामन्याला चार दिवस उलथून गेले असले तरी अजून केवळ १४१.१ ओव्हरचाच खेळ पार पडला आहे. त्यामुळे महामुकाबल्याचा महाविजेता कसा ठरणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहीला आहे.

    इतका महत्त्वाचा सामना असताना हवामानाकरिता बेभरवशी असलेल्या इंग्लंडच्या भूमीत हा सामना का खेळवला गेला, असा प्रश्न आता सोशल मीडियावर अनेक नेटकरी विचारत आहेत. इंग्लंडचा माजी खेळाडू केवीन पीटरसनने तर आयसीसीवर कडाडून टीका केली. आता याच्यात भर पडलीय. भारताचा धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवागची…!

    विरूने केलं ट्विट…