विराटकडून शिका ; सेहवागचा पंत आणि ईशानला सल्ला

मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ईशानच्या फलंदाजीच्या बळावर हा सामना खिशात घालण्यात यश मिळविले. यासोबत विराटही फॉर्ममध्ये परतला असून त्यानेही नाबाद ७३ धावांची खेळी करीत भारताला विजय मिळवून दिला.

    दिल्ली. धावपट्टीवर पाय रोवल्यानंतर ज्या पद्धतीने विराट सामन्याची दिशा बदलतो ती कला फलंदाज ऋषभ पंत आणि ईशान किशन यांनी आत्मसात करायला हवी, असे मत विरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. ईशान किशनने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी केली.

    मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ईशानच्या फलंदाजीच्या बळावर हा सामना खिशात घालण्यात यश मिळविले. यासोबत विराटही फॉर्ममध्ये परतला असून त्यानेही नाबाद ७३ धावांची खेळी करीत भारताला विजय मिळवून दिला.

    ज्यावेळी दिवसच विराटचा असतो त्यावेळी तो मॅच संपविणे आणि टीम इंडियाला विजयी करूनच परतावे असा विचार तो करतो. तो मला नेहमी म्हणतो, जर आजचा दिवस चांगला असेल तर जेवढे चांगले खेळता येईल तेवढे खेळ. नाबाद रहा आणि धावा काढ. कारण उद्याचा दिवस कसा असेल, धावा जमविता येईल की नाही, हे काहीच माहित नसते. परंतु आपण स्वत: कसे खेळत आहोत हे जाणवते. चेंडू फुटबॉलप्रमाणे नजरेस पडतो.

    - वीरेंद्र सेहवाग