IPL 2021 हैदराबादच्या कर्णधारपदावरून वॉर्नरची हकालपट्टी, नक्की काय झालं ?

हैदराबादच्या संघाची पहिल्या काही सामन्यांमधील कामगिरी यंदा सुमार राहिली आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ पहिल्या ६लढतीत फक्त १ विजय मिळवू शकला, तर ५ लढतीत पराभूत झाला. त्यामुळे उर्वरित आयपीएलसाठी त्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.

    आयपीएल २०२१ च्या १४ व्या हंगामामध्ये तळाशी असलेल्या सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) डेव्हिड वॉर्नर (David Warner) याची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. न्यूझीलंडचा खेळाडू केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

    हैदराबादच्या संघाची पहिल्या काही सामन्यांमधील कामगिरी यंदा सुमार राहिली आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ पहिल्या ६लढतीत फक्त १ विजय मिळवू शकला, तर ५ लढतीत पराभूत झाला. त्यामुळे उर्वरित आयपीएलसाठी त्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.

    हैदराबादचा पुढील सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाशी २ मे रोजी असून या लढतीत केन विलियम्सन संघाचे नेतृत्व करेन. तसेच संघात अन्यही काही बदल होण्याची शक्यता आहे.