वेटलिफ्टर  संजिता चानूला मिळणार अर्जुन पुरस्कार

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदके मिळवून देणारी वेटलिफ्टर संजिता चानूला २०१८ सालच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणामुळे तिला २०१७ च्या अर्जुन

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदके मिळवून देणारी वेटलिफ्टर संजिता चानूला २०१८ सालच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणामुळे तिला २०१७ च्या अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळण्यात आले होते. परंतु २०१८ च्या दिल्ली उच्च न्यायालायच्या निकालानुसार, संजिताला आता अर्जुन पुरस्कार देण्यात येईल. असे क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाचा संजितावर आरोप करण्यात आला होती. त्यानंतर २०१७ मध्ये अर्जुन पुरस्काराच्या यादीतून तिचे नाव वगळण्यात आले होते. परंतु उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाच्या आरोपामुळे, संजिताने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मे २०१८ मध्ये संजिता उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली होती.परंतु त्याच वर्षी उत्तेजकाची सुनावणी झाल्यानंतर तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.