वेस्ट इंडीजचा सर्वात वेगवान फलंदाज ब्रायन लाराने तयार केली सर्वात्कृष्ट क्रिकेटपटूंची यादी, भारतातील ‘या’ दोन खेळाडूंची नावे आली समोर

ब्रायन लाराने (Brian Lara) क्रिकेटपटूंची नावे यादी (List Of Cricketers) सहभागी केली असून भारतीय टीममधून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अशा महान आणि सलामीवीर खेळाडूंची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत

जगातील महान खेळाडूंपैकी एक वेस्ट इंडीजचा वेगवान फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara List) तत्कालीन फलंदाज आणि गोलंदाजांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये भारतातील दोन क्रिकेटपटूंची नावे आहेत. त्यामुळे ब्रायन लाराच्या या यादीची चर्चा (List)  जोरदार रंगत आहे. लाराने या यादीला सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केली आहे.

यादीमध्ये आहेत दोन भारतीय खेळाडूंची नावं

ब्रायन लाराने क्रिकेटपटूंची नावे यादी सहभागी केली असून भारतीय टीममधून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अशा महान आणि सलामीवीर खेळाडूंची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. लाराने आपल्या यादीमध्ये उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडच्या केन विलियम्सन, इंग्लंडच्या जो रूट, दक्षिण आफ्रीकामधून एबी डिविलियर्स आणि ऑस्ट्रेलियामधून स्टीव्ह स्मिथ या खेळाडूंची नावे सुद्दा यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Brian Lara (@brianlaraofficial)

इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

ब्रायन लाराने आपल्या इन्स्टाग्रामवर या यादीचा फोटो शेअर केला आहे. लाराने गोलंदाजांमध्ये जसप्रीम बुमराहसोबतच इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन, दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान या महान गोलंदाजांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

पाच बेस्ट गोलंदाज आणि फलंदाज

या यादीमध्ये पाच बेस्ट गोलंदाज आणि फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, रिकी पॉईटिंग, जॅक्स कॅलिस, कुमार संगाकारा, राहुल द्रविडची नावे फलंदाजांमध्ये आहेत. तर वसीम अकरम, शेन वॉर्न, वकार युनिस, मुथैया मुरलीधरन आणि ग्लैन मैक्ग्रा अशा पाच बेस्ट गोलंदाजांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.