भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं पुढे काय? विजेता कोण? जाणून घ्या

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१नं आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही मालिका भारतानं जिंकली आहे का, असा प्रश्न निर्माण उपस्थित होतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी बीसीसीआय आणि ईसीबीच्या निवेदनाची वाट पाहावी लागेल.

    भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेवटचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. आधी हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. मात्र त्यानंतर कसोटी सामनाच रद्द करण्याची घोषणा झाली.

    मालिका विजेता कोण? इंग्लंड की भारत?
    पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-१नं आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही मालिका भारतानं जिंकली आहे का, असा प्रश्न निर्माण उपस्थित होतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी बीसीसीआय आणि ईसीबीच्या निवेदनाची वाट पाहावी लागेल.

    पाचवी कसोटी खेळवली जाणार का, याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्ड्स मिळून घेतील. जर पाचवी कसोटी खेळवली जाणार असेल तर कधी, याचाही निर्णय दोन्ही बोर्ड्स मिळून घेतील.

    भारतीय संघ आपले खेळाडू मैदानावर उतरवण्यास तयार नसल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे. तसं निवेदन ईसीबीकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. बीसीसीआयसोबतच्या चर्चेनंतर पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं ईसीबीनं म्हटलं आहे.