टी-२० वर्ल्डकपनंतर अनिल कुंबळे किंवा लक्ष्मण यांना कोच केले जाण्याची शक्यता, BCCIने महेला जयवर्धनेशीही संपर्क केल्याची माहिती

२०१७ साली जेव्हा कुंबळेंनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर रवी शास्त्री यांच्या नावाला विराट कोहलीने पाठिंबा दिला होता. मात्र कुंबळेंनी हे पद सोडू नये, अशी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची भूमिका होती. त्यावेळी गांगुली क्रिकेट सुधार समितीत होते. या समितीत व्हीव्हेस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरही होते. या दोघांचाही त्यावेळी कुंबळेंना पाठिंबा होता. आता पुन्हा कदा कुंबळेंच्या गळ्यात कोचपदाची माळ घालण्याचा प्रयत्न बीसीसीआयकडून करण्यात येतो आहे.

  मुंबई- टी-२० वर्ल्ड कपनंतर कोच रवी शास्त्री यांच्याजागी अनिल कुंबळे किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० वर्ल्ड कपनंतर संपतोय. यापुढे या पदावर राहणार नसल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा नवा कोच कोम होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.

  काही न्यूज एजन्सींनी बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती दिली आहे. तर दुरीकडे मुंबई इंडियन्सचे कोच महेला जयवर्धने यांच्याशीही बीसीसीआयने संपर्क साधल्याचीही चर्चा आहे.

  कुंबळेंची दावेदारी मजबूत

  रवी शास्त्री हे पदावंरुन दूर झाल्यानंतर, यापूर्वी टीम इंडियाचा कोच राहिलेल्या अनिल कुंबळे या नावाला अधिक संधी असण्याची शक्यता आहे. २०१६ साली अनिल कुंबळे यांची निवड कोच म्हणून करण्यात आली होती. मात्र २०१७ साली पायउपतार होण्याचा निर्णय कुंबळे यांनी घेतला होता. कॅप्टन विराट कोहली याच्याशी झालेल्या मतभेदामुळे कुबळेंनी हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. आपल्या कार्यपद्धतीवर विराट कोहलीला आक्षेप असल्याचे पाहून आश्चर्य वाटल्याचे कुंबळे यांनी राजीनाम्यात लिहिले होते. कोहली आणि कुंबळे यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआयने प्रयत्न केल्याचेही कुंबळे यांनी म्हटले होते.

  २०१७ साली जेव्हा कुंबळेंनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर रवी शास्त्री यांच्या नावाला विराट कोहलीने पाठिंबा दिला होता. मात्र कुंबळेंनी हे पद सोडू नये, अशी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची भूमिका होती. त्यावेळी गांगुली क्रिकेट सुधार समितीत होते. या समितीत व्हीव्हेस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरही होते. या दोघांचाही त्यावेळी कुंबळेंना पाठिंबा होता. आता पुन्हा कदा कुंबळेंच्या गळ्यात कोचपदाची माळ घालण्याचा प्रयत्न बीसीसीआयकडून करण्यात येतो आहे.

  अनिल कुंबळे यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहचली होती. त्यावेळी पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता. सध्या कुंबळे दुबईत असून, ते किंग्ज पंजाबचे मुख्य कोच आहेत.