यंदा मुंबईला का बदलावी लागली रणनिती? जाणून घ्या

आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा चॅम्पियन बनणाऱ्या मुंबईसाठी ही कामगिरी नक्कीच साजेशी नाही. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे.

    नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी ठिकठाकच म्हणावी लागेल. मुंबईने या मोसमात खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ३ मध्ये त्यांच्या विजय झाला, तर ३सामने त्यांना गमवावे लागले. आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा चॅम्पियन बनणाऱ्या मुंबईसाठी ही कामगिरी नक्कीच साजेशी नाही. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर आहे.

    आतापर्यंत अर्धी आयपीएलच झालेली असताना मुंबईने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सगळे ८ परदेशी खेळाडू मैदानात उतरवले, तर मागच्या संपूर्ण मोसमात मुंबईने फक्त ५ परदेशी खेळाडूंना संधी दिली होती.

    मुंबईकडून या मोसमात क्रिस लीन, मार्को जेनसन, क्विंटन डिकॉक, कायरन पोलार्ड, जेम्स नीशम, एडम मिल्ने, ट्रेन्ट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल या सगळ्यांना संधी देण्यात आली.