२०२१ मध्ये विम्बल्डन टेनिस स्पर्धा प्रेक्षकांशिवाय होण्याची शक्यता?

 कोरोनाचे संकट (corona virus) दिवसागणिक वाढत आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे विविध प्रकारचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. तसेच २०२१ मध्ये होणारी विम्बल्डन टेनिस खुली स्पर्धा (Wimbledon tennis tournament) प्रेक्षकांशिवाय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाचे संकट (corona virus) दिवसागणिक वाढत आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे विविध प्रकारचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. तसेच २०२१ मध्ये होणारी विम्बल्डन टेनिस खुली स्पर्धा (Wimbledon tennis tournament) प्रेक्षकांशिवाय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विम्बल्डन टेनिस खुली स्पर्धा या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रद्द (cancelled) करावी लागली असली तरी पुढील वर्षी प्रेक्षकांसह अथवा प्रेक्षकांशिवाय (without audience) आयोजन करण्याच्या दृष्टीने आयोजकांची तयारी सुरू झाली आहे.

२०२१मध्ये कोणत्याही स्थितीत विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आयोजन आम्हाला करायचे आहे. त्याच वेळेला खेळाडूंचे, कर्मचाऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे आरोग्य जपण्याला प्राधान्य असेल. कोरोना साथीच्या काळात नेमके कशाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, हे आम्ही समजून घेणार आहोत, असे बोल्टन यांनी स्पष्ट केले.

विम्बल्डनचे पुढील वर्षी २८ जून ते ११ जुलैदरम्यान आयोजन होणे अपेक्षित आहे. आता ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवायची की प्रेक्षकांना परवानगी द्यायची, याबाबतचा निर्णय मात्र अजून झालेला नाही.