पैलवान सुशील कुमारला अखेर बेड्या, दिल्ली पोलिसांनी केली अटक

पैलवान सुशील कुमारसह त्याचा खासगी सचिव अजय कुमार यालाही पोलिसांनी अटक केलीय. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारच्या अटकेसाठी पंजाब आणि हरियाणात शोधमोहीम राबवली होती.

    नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या 23 वर्षीय सागर राणा हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारला अखेर अटक करण्यात आली आहे.  दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला पंजाबमध्ये बेड्या ठोकल्याची माहिती मिळतेय.

    पैलवान सुशील कुमारसह त्याचा खासगी सचिव अजय कुमार यालाही पोलिसांनी अटक केलीय. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारच्या अटकेसाठी पंजाब आणि हरियाणात शोधमोहीम राबवली होती.

    सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमार गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी इनामही जाहीर केलं होतं. सुशील कुमारच्या नावावर 1 लाख तर अजय कुमारवर 50 हजाराचं इनाम ठेवण्यात आलं होतं. सागर राणा याची हत्या झाल्यापासून कुस्तीपटू सुशील कुमार परागंदा आहे. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.