पैलवान सुशीलकुमारने कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून केलीये अजब मागणी; क्लिक करा आणि जाणून घ्या

रोहिणी कोर्टाच्‍या मुख्‍य न्‍यायाधीशांनी सुशील कुमारची याचिका फेटाळली होती. सुशीलकुमार याला कारागृहात योग्‍य आहार दिला जात आहे. त्‍याला विशेष आहार देण्‍याची गरज नाही. तुम्‍ही कोण आहात, तुमची योग्‍यता काय, तुमचा सामजिक स्‍तर कसा आहे, या सर्वबाबींचा कायदा विचार करत नाही.

    नवी दिल्‍ली : सागर राणा हत्‍या प्रकरणातील संशयित आरोपी व ऑलिम्‍पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार सध्‍या तिहार कारागृहात आहे. येथे त्‍याने पुन्‍हा एकदा अजब मागणी केली आहे. मला टीव्‍ही पाहण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन द्‍या, अशी मागणी त्‍याने कारागृह अधीक्षकांना पत्राव्‍दारे केली आहे.

    ‘मला टीव्‍ही पाहण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन द्‍या. यामुळे कुस्‍ती जगतामध्‍ये सध्‍या काय चालले आहे, याची माहिती मला मिळेल’, असा दावा त्‍याने पत्रात केला असल्‍याचे सूत्रांनी सांगितले. कारागृहातील जेवणाने शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीत. त्‍यामुळे मला प्रोटीनयुक्‍त अतिरिक्‍त आहार देण्‍यात यावा, अशी मागणी करणारी याचिका त्‍याने यापूर्वी केली होती.

    रोहिणी कोर्टाच्‍या मुख्‍य न्‍यायाधीशांनी सुशील कुमारची याचिका फेटाळली होती. सुशीलकुमार याला कारागृहात योग्‍य आहार दिला जात आहे. त्‍याला विशेष आहार देण्‍याची गरज नाही. तुम्‍ही कोण आहात, तुमची योग्‍यता काय, तुमचा सामजिक स्‍तर कसा आहे, या सर्वबाबींचा कायदा विचार करत नाही. कायद्यापुढे सर्व समान आहे, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले होते.

    ४ मे २०२१ रोजी छत्रसाल स्‍टेडियमजवळील मॉडेल टाउन परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती. यावेळी जखमी झालेला सागर राणा याचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला होता.सुशीलकुमार हा आपल्‍या साथीदारांसह सागर राणा याला मारहाण करताचे चित्रण सीसीटीव्‍हीमध्‍ये झाले होते. गुन्‍ह्यानंतर तो फरार झाला होता. त्‍याच्‍या नावावर १ लाख रुपांचे इनाम ठेवण्‍यात आले होते. रोहिणी सत्र न्‍यायालयाने सुशील कुमार याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सुशीलकुमार याने २००८च्‍या बीजिंग ऑलिम्‍पिकमध्‍ये कांस्‍य तर २०१२च्‍या लंडन ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत रौप्‍य पदक पटकावले होते. त्‍याला २००९ मध्‍ये सर्वोच्‍च क्रीडा सन्‍मान राजीव गांधी खेलरत्‍न सन्‍मानाने गौरवण्‍यात आले होते.

    Wrestler Sushilkumar says Provide TV for him to updates of Wrestling world