‘या’ खेळाडूंना मिळणार यंदाचा ‘अर्जून पुरस्कार’

हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या देशातील विविध भागातील खेळाडूंना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी देशातील मान्यता प्राप्त क्रीडा संघटना, इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA) आणि स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियाकडून (SAI) खेळाडूंच्या नावाची शिफारस केली जाते.

    आज राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्त साधत (National Sports Day) आजच्याच दिवशी देशातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना व प्रशिक्षकांना खेलरत्न , अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केलं जातं. ‘ मेजर ध्यानचंद खेलरत्न ‘ पुरस्कारानंतर ‘अर्जुन पुरस्कार’ हा देशातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी खाली खेळाडू आहेत.

    अर्जुन पुरस्काराचे मानकरी

    हरमनप्रीत सिंह, वंदना कटारिया, नवजोत कौर – हॉकी

    एलावेनिल वलारिवन, अभिषेक वर्मा – नेमबाजी

    सुतीर्था मुखर्जी, अहिका मुखर्जी, मानव ठक्कर – टेबल टेनिस

    उदयन माने, राशिद खान, दीक्षा डागर – गोल्फ

    मुस्कान किरार – तिरंदाजी

    रवि कुमार दहिया, दीपक पुनिया, अंशु मलिक, सरिता मोर – कुस्ती

    अंकिता रैना, प्रजनेश गुणेश्वरन – टेनिस

    सिमरनजीत कौर, गौरव सोळंकी, सोनिया चहल – बॉक्सिंग

    बाला देवी – फुटबॉल

    शिखर धवन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह – क्रिकेट

    एचएस प्रणय, प्रणव जेरी चोपड़ा, समीर वर्मा – बॅडमिंटन

    जेहान दारूवाला – मोटरस्पोर्ट्स

    दुती चंद – ओडिशा स्पोर्ट्स

    विदित संतोष गुजराती, अदिभान भास्करन, एसपी सेथुरमण, एमआर ललिल बाबू, भक्ती कुलकर्णी, पद्मिनी राऊत – बुद्धीबळ (चेस)

    साजन प्रकाश – (स्विमिंग)

    पुरस्काराचे  स्वरूप
    पुरस्कार विजेत्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि १५ लाख रुपये देण्यात येतात.