कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुढे सरसावला ‘सिंक्सर किंग’ युवराज सिंग

वन एंटरटेनमेंटच्या भागीदारीत हा उपक्रम सुरू केला जाईल, असे ‘यू वी कॅन’ने सांगितले. ऑक्सिजन, सुसज्ज बेड, व्हेंटिलेटरद्वारे रुग्णालयांची क्षमता वाढवणे हे आमचे लक्ष्य असल्याचे फाऊंडेशनने सांगितले.

    भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगही रुग्णालयांमधील बेड वाढवण्यासाठी आपल्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युवराजची फाऊंडेशन ‘यू वी कॅन’ने यासंदर्भात ही माहिती दिली. फाऊंडेशनच्या मते, भारतातील करोना रूग्णांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या रूग्णालयात एक हजार अतिरिक्त बेडची व्यवस्था केली जाईल.

    वन एंटरटेनमेंटच्या भागीदारीत हा उपक्रम सुरू केला जाईल, असे ‘यू वी कॅन’ने सांगितले. ऑक्सिजन, सुसज्ज बेड, व्हेंटिलेटरद्वारे रुग्णालयांची क्षमता वाढवणे हे आमचे लक्ष्य असल्याचे फाऊंडेशनने सांगितले.

    सर्वांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत. ऑक्सिजन, आयसीयू बेड्स आणि इतर आवश्यक सुविधांसाठी असंख्य लोकांना झगडताना पाहिले आहे. यावरुन मी खूप प्रभावित झालो आणि मला वाटले की आपण आपल्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या लोकांना तसेच केंद्र व राज्य सरकारांना मदत करायला पुढे आलो पाहिजे, असे युवराज म्हणाला.