मुंबईच्या १६ वर्षीय गौरांग बागवेने केला ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर. चा पराभव; कल्याणमध्ये पार पडली पहिली आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा

या आमदार चषक स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेतील प्रथम विजेता गौरांग बागवे (मुंबई) याला होंडा ॲक्टिवा व ट्रॉफी, द्वितीय विजेता ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर.(चेन्नई) यांना २० हजारांचे रोख बक्षीस व व ट्रॉफी, तृतीय विजेता मंदार लाड (पुणे) यास १५ हजार रोख बक्षीस व ट्रॉफी तसेच विविध गटातील विजयी स्पर्धकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

    कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा  मतदारसंघाचे (Kalyan West Assembly Constituency) आमदार विश्वनाथ भोईर (MLA Vishwanath Bhoir) व कल्याण तालुका बुध्दिबळ संस्थेद्वारा (Kalyan Taluka Chess Association) आयोजित “पहिला आमदार चषक ” (1st Aamdar Chashak) अखिल भारतीय खुले जलद नामांकन बुध्दीबळ स्पर्धा-२०२३ कल्याण पश्चिम येथील नटरंग हॉल,बैलबाजार (Natrang Hall, BailBazar, Kalyan West) येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबईच्या १६ वर्षीय गौरांग बागवेने ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर. चा पराभव केला (In this tournament 16 year old Gaurang Bagve of Mumbai beat Grandmaster Laxman R R Defeated). “पहिला आमदार चषक”अखिल भारतीय बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्रसह १७ राज्यातील ६१३ खेळाडूंनी भाग घेतला.

    या आमदार चषक स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेतील प्रथम विजेता गौरांग बागवे (मुंबई) याला होंडा ॲक्टिवा व ट्रॉफी, द्वितीय विजेता ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर.(चेन्नई) यांना २० हजारांचे रोख बक्षीस व व ट्रॉफी, तृतीय विजेता मंदार लाड (पुणे) यास १५ हजार रोख बक्षीस व ट्रॉफी तसेच विविध गटातील विजयी स्पर्धकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

    याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील, कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय पाटील, विधानसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, मोहन उगले, शिवसेना उपशहर प्रमुख सुनील खारूक, शिवसेना विभाग प्रमुख रामदास कारभारी, डॉ.धीरज पाटील, शाखा प्रमुख गणेश कोटे, कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे मोहित लढे, संघर्ष सोमण, डॉ. दीपक तांडेल यांच्यासह राज्यभरातून आलेले खेळाडू व त्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.