Third Eye Under 14 Cricket Championship

  पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत सार्थक ढमढेरे (80धावा), विहान केंजळे (62धावा) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राहुल क्रिकेट अकादमी संघाने व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा 94 धावांनी पराभव करीत विजेतेपद संपादन केले आहे.

  44.1 षटकांत सर्वबाद 231 धावा

  सनराईज क्रिकेट स्कूल येथील मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना राहुल क्रिकेट अकादमी संघाने 44.1 षटकांत सर्वबाद 231 धावा केल्या. यात सार्थक ढमढेरेने 101 चेंडूत 11चौकारासह 80धावा, तर विहान केंजळेने 65 चेंडूत 8चौकार व 1षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 104 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. व्हेरॉक संघाकडून अर्णव मधुगिरी (3-53), रुद्र पाटील(2-43) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

  अफलातून गोलंदाजी करत संघाला विजय

  याच्या उत्तरात व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा डाव 38 षटकात सर्वबाद 137 धावावर संपुष्टात आला. यात प्रज्वल मोरे 38, औम पाटील 19, वीरेन मिराजे 18, अभिषेक टोपनो 16 यांनी थोडासा प्रतिकार केला. राहुल क्रिकेट अकादमीकरून प्रणित जगताप(2-12), साई कुंभार(2-25), ओम वाईकर(2-29), प्रतीक कडलक(1-15), प्रसाद आंबळे(1-21), दीप पाटील(1-14) यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर सार्थक ढमढेरे ठरला.

  स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपीचे संचालक अभिषेक अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

  निकाल : अंतिम फेरी :
  राहुल क्रिकेट अकादमीः 44.1 षटकात सर्वबाद 231 धावा (सार्थक ढमढेरे 80(101,11×4), विहान केंजळे 62(65,8×4,1×6), एकनाथ देवडे 20, श्रेयश फडतरे नाबाद 12, अर्णव मधुगिरी 3-53, रुद्र पाटील 2-43) वि.वि.व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 38 षटकात सर्वबाद 137 (प्रज्वल मोरे 38(73,4×4), ओम पाटील 19, वीरेन मिरजे 18, अभिषेक टोपनो 16, प्रणित जगताप 2-12 , साई कुंभार 2-25, ओम वाईकर 2-29, प्रतीक कडलक 1-15, प्रसाद आंबळे 1-21, दीप पाटील 1-14); सामनावीर – सार्थक ढमढेरे; राहुल क्रिकेट अकादमी 94 धावांनी विजयी.

  इतर पारितोषिके :
  सर्वोत्कृष्ट फलंदाज : नीलमेघ नागवकर(482 धावा);
  सर्वोत्कृष्ट गोलंदाज : अर्णव मधुगीरी (14विकेट);
  मालिकावीर : नीलमेघ नागवकर
  सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक : प्रज्वल मोरे.