26-january-2023-gate-way-of-india-to-dombivali-65-kms-ultra-race-pwd-minister-ravindra-chavan

ही दौड ६५ कि.मी ची असून या दौड मध्ये १८ ते ६७ वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत.  डोंबिवली, कल्याण, ठाणे, पुणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा इ. ठिकाणाहून १०० पेक्षा अधिक धावपटू यात सहभाग घेणार आहेत.

    कल्याण : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित (Indian Independance Day), भारतीय सैनिकांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यासाठी (Salute To Indian Soldiers) एक दौड वीर जवानोंके लिये (A Race For Brave Soldiers) अशी अल्ट्रा दौड (Ultra Race) गेटवे ऑफ इंडियापासून (Gateway Of India) २६ जानेवारी २०२३ (26 January 2023) रोजी रात्री 00.00 वाजता सुरू होऊन डोंबिवली (Dombivali)  येथे सकाळी ८.३० या समाप्त होणार आहे.

    ही दौड ६५ कि.मी ची असून या दौड मध्ये १८ ते ६७ वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत.  डोंबिवली, कल्याण, ठाणे, पुणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा इ. ठिकाणाहून १०० पेक्षा अधिक धावपटू यात सहभाग घेणार आहेत.

    या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी या दौड मध्ये सामील होणारे प्रोफेशनल धावपटू नसून डॉक्टर इंजिनियर व इतर क्षेत्रातील व्यक्तिमत्व असणारी लोकं सामील होत असून अशा उपक्रमामुळे पोलीस किंवा लष्करी जवान सैन्य भरती यामध्ये यांचा मोठा फायदा तरुण वर्गाला असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी व राजकारणी मंडळींसोबतच इंडस्ट्रियल कंपन्यांनी खेळाडूंना मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.