2nd Millennium National School
2nd Millennium National School

    पुणे : कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित दुसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कविश लिमये, वेदांत काळे, शाश्वत गुप्ता, प्रथमेश शेरला यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

    6.5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

    कर्वेरोड येथील मिलेनियम स्कुल, कर्वेरोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत 9 वर्षाखालील गटात  फेरीत कविश लिमयेने मिहीका बोलेचा पराभव करून 6.5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.

    शाश्वतने 6 गुणांसह विजेतेपद पटकावले

    11 वर्षाखालील गटात वेदांत काळेने युग बराडीयाला बरोबरीत रोखले व 6.5 गुणांसह विजेतेपद पटकावले. 13 वर्षाखालील गटात प्रथमेश शेरलाने अभिजय वाळवेकरचा पराभव करून 6.5 गुण मिळवले व प्रथम क्रमांकासह विजेतेपदाचा मान पटकावला. 15 वर्षांखालील गटात शाश्वत गुप्ता व अनय उपलेंचवर यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. पण शाश्वतने 6 गुणांसह विजेतेपद पटकावले.

    32 हजार रुपयांची पारितोषिके

    स्पर्धेत एकूण 32 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे आणि मिलेनियम नॅशनल स्कुलचे अभिमन्यू वकील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिषेक केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.