ICC टी-20 टीममध्ये ३ भारतीय क्रिकेटर्स, विराट, सूर्या आणि हार्दिक यांचा समावेश

या टीममध्ये टीम इंडियाचा एक्स कॅप्टन विराट कोहली, स्पोटक बॅट्समन सूर्यकुमार यादव आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांचा समावेश करण्यात आलाय. तर वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या इंग्लंडच्या जोस बटलर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटं ठरलेल्या सॅम करन यांचा समावेश करण्यात आलाय.

  मुंबई : इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) नं 2022 सालची ICC मेन्स टी-20 टीम ऑफ द इय़त घोषित केली आहे. सोमवारी घोषित केलेल्या या टीममध्ये टीम इंडियाच्या 3 क्रिकेटर्सना संधी मिळालीय. तर यात इंद्लंड आणि पाकिस्तानचे 2-2 प्लेयर्स निवडण्यात आलेत.

  आश्चर्यकारक बाब म्हणजे या टीममध्ये ऑस्टेरिलायतील एकाही प्लेयरचा समावेश करण्यात आलेला नाही. तर झिम्बाब्वे आणि आयर्लंड या टीमच्या एकेका प्लेयरचा समावेश करण्यात आलेला आहे.

  टीम इंडियातून कुणाला संधी

  या टीममध्ये टीम इंडियाचा एक्स कॅप्टन विराट कोहली, स्पोटक बॅट्समन सूर्यकुमार यादव आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांचा समावेश करण्यात आलाय. तर वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या इंग्लंडच्या जोस बटलर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटं ठरलेल्या सॅम करन यांचा समावेश करण्यात आलाय. पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान आणि हासिफ राऊफ यांचाही या टीममध्ये समावेश आहे. बाबर आजम याला टीममध्ये जागा मिळालेली नाही. झिम्बाब्वेच्या सिकंदर रजा आणि आयर्लंडच्या जोशुआ लिटिल यांचा समावेश करण्यात आलाय.

  2022 च्या कामदिरीवर टीमची निवड

  ICCनं 11 सदस्यीय टीमची निवड ही साल 2022 सालातील त्यांच्या कामगिरीवरुन केलेली आहे. टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी कशी होती, यावरुन हा निर्णय करण्यात आलेला आहे.

  तर ICC वुमेन्स टीममध्ये चार भारतीय

  मेन्ससह वुमेन्सच्याही टी-20 साठीची टीम ऑप इ इयर घोषित करण्यात आलीय. त्यात भारतातील ४ क्रिकेटर्सचा समावेश आहे. यात स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, रिचा घोष आणि रेणुका सिंग ठाकूर यांचा समावेश करण्यात आलाय.