डोकं वाकवत महिला खेळाडूने फेकला असा चेंडू.. सोशल मीडियावर फोटो व्हायरल

महिला टी20 चॅलेंजचा दुसरा सामना मंगळवारी 24 मे रोजी खेळला गेला. या सामन्यात दीप्ती शर्माची व्हेलॉसिटी आणि हरमनप्रीत कौर हिच्या सुपरनोव्हा यांच्यात सामना झाला, जिथे दीप्ती अँड कंपनीने वेलोसिटीचा पराभव केला.दुसरीकडे या सामन्यात माया सोनवणेने अनोख्या पद्धतीने गोलंदाजी केली.

    महिला टी20 चॅलेंजचा दुसरा सामना मंगळवारी 24 मे रोजी खेळला गेला. या सामन्यात दीप्ती शर्माची व्हेलॉसिटी आणि हरमनप्रीत कौर हिच्या सुपरनोव्हा यांच्यात सामना झाला, जिथे दीप्ती अँड कंपनीने वेलोसिटीचा पराभव केला.दुसरीकडे या सामन्यात माया सोनवणेने अनोख्या पद्धतीने गोलंदाजी केली. तिच्या गोलंदाजीच्या शैलीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला असून या विचित्र गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    माया सोनवणेच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनने सर्वांनाच केले चकित
    23 वर्षीय माया सोनवणे हिने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनने सर्वांनाच चकित केले. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात मायाने विचित्र शैलीत गोलंदाजी केली तिच्या गोलंदाजीच्या शैलीचीच सोशल मीडियावर चर्चा आहे. मायाच्या बॉलिंगची ही अ‍ॅक्शन खरच विचित्र आहे, हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचंही डोकं नक्की गरगरेल

    तिच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनमुळे तिची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज पॉल अॅडम्सशी केली जात आहे . तसेच तिला बघून अनेक क्रिकेटप्रेमींना शिविल कौशिकची आठवण झाली. शिविल कौशिक हा आयपीएल संघ गुजरात लायन्सचा भाग आहे. मायाच्या बॉलिंग अ‍ॅक्शनने सगळेच हैराण झाले आहेत. गोलंदाजीत ती काही अप्रतिम कामगिरी करू शकली नाही मात्र मायाची ही बॉलिंग ऍक्शन चर्चेचा विषय नक्की बनला.

    व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हा यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे तर तर या सामन्यात व्हेलॉसिटीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हासने व्हेलॉसिटीसमोर 151 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधारपदाची खेळी खेळताना हरमनप्रीत कौरने 51 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. दुसरीकडे तानिया भाटियाने 32 चेंडूत 36 धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर सुपरनोव्हा संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा केल्या. दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीने लॉरा व्होल्वार्डॅटोने नाबाद 51 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शेफाली वर्मानेही झटपट अर्धशतक झळकावले. परिणामी व्हेलॉसिटीने हा सामना 7 गडी राखून जिंकला.