दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा झटका! कर्णधार पुढच्या सामन्यात संघाबाहेर

12 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.

  रिषभ पंत : इंडियन प्रीमियर लीग 2024च्या (Indian Premier League 2024) या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) पुनरागमन केले आहे. परंतु त्यांची सुरुवात या हंगामात फार काही चांगली झाली नाही. परंतु दिल्ली कॅपिटल्सचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अडचणी वाढल्या आहेत. डीसीचा कर्णधार ऋषभ पंतवर स्लो ओव्हर रेटच्या दंडामुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधार रिषभ पंत पुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. 12 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.

  दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का
  दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघामध्ये जो संघ उद्याचा सामना जिंकेल तो संघ प्लेऑफ च्या शर्यतीत टिकून राहील. परंतु दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत संघामध्ये नसल्यामुळे संघ नक्कीच अडचणीत आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दिल्लीसाठी हा मोठा धक्का आहे. आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की, गेल्या मंगळवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला स्लो-ओव्हर रेटसाठी दोषी ठरवण्यात आले होते, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराला शिक्षा झाली आहे. आपणास सांगूया की पंतने दोनदा स्लो-ओव्हर रेटमुळे लाखो रुपयांचा दंड भरला आहे.

  पंतवर दंड आणि एका सामन्याची बंदी
  इंडियन प्रीमियर लीगच्या आचारसंहितेनुसार, संघाचा कर्णधार एखाद्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास त्याला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागतो. दुसरीकडे, संथ गतीने षटक टाकल्याबद्दल दोषी आढळल्याने कर्णधाराला 24 लाख रुपये द्यावे लागतात. पंतने याआधी दोनदा स्लो-ओव्हर रेटमुळे लाखो रुपयांचा दंड भरला आहे. त्यामुळे आता संघाने तिसऱ्यांदा असे केले तर कर्णधारावर 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालावी लागते. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे केवळ पंतलाच नाही तर इतर सर्व खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

  गुणतालिकेची स्थिती
  सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर आहेत. आतापर्यत दिल्लीचे 12 सामने झाले आहेत त्यामध्ये त्यांनी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 12 मे रोजी रविवारी होणाऱ्या या महामुकाबल्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये ‘करो या मरो’ अशी स्थिती असणार आहे. ज्या संघाचा उद्याच्या सामन्यात पराभव होईल तो संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे.