भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील क्रिकेट संघात मोठा बदल

    ध्या भारताच्या क्रिकेट रसिकांचे डोळे हे भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे आणि आशिया कप दौऱ्याकडे लागले आहेत. आता भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता. बीसीसीआयकडून केएल राहुल तंदुरुस्त असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. केएल राहुल आता तंदुरुस्त झाल्यामुळे भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

    बीसीसीआयने गुरुवारी संध्याकाळी ट्वीट करत भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात केएल राहुल हा संघाचा कर्णधार असणार आहे याची माहिती दिली.
    धक्कादायक बाब म्हणजे, ३० जुलै रोजी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली होती. त्यामध्ये केएल राहुलचे नावच नव्हते. तीन एकदिवसीय सामन्यासाठी संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र, १० दिवसांत शिखर धवनच्या जागी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिखर धवनचे चाहते नाराज झाल्याची चर्चा रंगत आहे. कर्णधार पदावरून धवन चा पाण उतारा करून झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

    बीसीसीआयने ट्विट करत राहुल फिट असून झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यात संघाचं नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमध्ये राहुलला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे.

    झिम्बाब्वे विरोधात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ –
    केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.