IPL 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीवर दिसणार मोठा बदल!

आयपीएलमधील महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंच्या जर्सीवर एतिहादचा लोगो दिसणार आहे.

  चेन्नई सुपर किंग्ज आणि यूएईची राष्ट्रीय एअरलाइन एतिहाद एअरवेज यांच्याशी प्रायोजकत्व करार करण्यात आला आहे. तसेच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. त्याच वेळी, या करारानंतर, इतिहाद चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य प्रायोजक असेल. म्हणजेच आयपीएलमधील महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंच्या जर्सीवर एतिहादचा लोगो दिसणार आहे.

  जर्सीचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल…
  चेन्नईतील कलाईवनार अरंगम येथे ‘अनावरण कार्यक्रम’ जाहीर करण्यात आला होता. या कार्यक्रमात, चेन्नई सुपर किंग्ज आणि संयुक्त अरब अमिरातीची राष्ट्रीय विमान कंपनी एतिहाद एअरवेज यांच्यात प्रायोजकत्व कराराची घोषणा करण्यात आली. यावेळी मुकेश चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, दीपक चहर, सिमरजीत सिंग आदी खेळाडूंसह चेन्नई सुपर किंग्जचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय अंदाजे २ हजार चाहते या कार्यक्रमाचा भाग झाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

  चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन काय म्हणाले?
  चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, हा करार पारंपारिक प्रायोजकत्वाच्या सीमेपलीकडे जातो. आमच्या चाहत्यांसाठी एक विलक्षण अनुभव निर्माण करणे आणि क्रीडा भागीदारीमध्ये नवीन मानके स्थापित करणे याबद्दल आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स चेन्नई सुपर किंग्जच्या नवीन जर्सीवर सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.