भारताच्या माजी क्रिकेटपटूने एक मोठी भविष्यवाणी! युझवेंद्र चहल खेळणार टी-20 वर्ल्ड कप?

गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राजस्थानने पंजाब किंग्जला केवळ 147/8 धावांवर रोखले. केशव महाराजने चार षटकांत २३ धावा देत दोन गडी बाद केले. तर युझवेंद्र चहलला एक विकेट मिळाली.

    सध्या आयपीएल 2024 चा सिझन हा रंजक होत चालला आहे. आयपीएल 2024 च्या 27 व्या सामन्यात शनिवारी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्याचबरोबर पंजाब किंग्सचा पराभव सुद्धा केला. गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राजस्थानने पंजाब किंग्जला केवळ 147/8 धावांवर रोखले. केशव महाराजने चार षटकांत २३ धावा देत दोन गडी बाद केले. तर युझवेंद्र चहलला एक विकेट मिळाली.

    युझवेंद्र चहल हा जगामधील सर्वात्तम फिरकीपटूपैकी एक आहे. युझवेंद्र चहलला एक विकेट मिळाली. प्रभासिमरनला बाद करून युझवेंद्र चहलने आयपीएलमधील त्याच्या एकूण विकेट्सची संख्या 200 च्या जवळ नेली. भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने आयपीएलमध्ये 198 विकेट घेतल्या आहेत. या यादीत तो अव्वल आहे. त्याच्या जवळ कोणीही नाही. चेन्नई सुपर किंग्जचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्हो 183 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

    वसीम जाफरची भविष्यवाणी
    युजवेंद्र चहलने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत. सध्या त्याच्या डोक्यावर जांभळ्या रंगाची टोपी सजली आहे. युजवेंद्र चहलची कामगिरी पाहता भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी तो भारतीय संघाचा भाग नसल्याचा जाफरचा विश्वास आहे.