भारतीय संघासमोर १६० धावांच आव्हान

    आज भारत पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. मधल्या फळीतील पाकिस्तानचे काही फलंदाज वगळता भारतीय गोलंदाजांनी कोणत्याही फलंदाजाला अधिक काळ मैदानात स्थिरावू दिले नाही.

    भारतीय संघाने २० षटकात १५९ धावांवर भारतीय संघाला रोखले. या दरम्यान भारताने पाकिस्तान संघातील ८ फलंदाजांच्या विकेट घेतल्या. त्यात हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग याने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे प्रत्येकी १ विकेट घेण्यात यशस्वी झाले.

    टी २० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १६० धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय संघ फलंदाजी करताना काय कमाल दाखवतो हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.