भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या हॉटेल रूममधून निघाला साप!

  भारतात सुरु असलेल्या लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसन (Mitchell Johnson) हा भारतात आला आहे. दरम्यान क्रिकेटपटू मिचेल जॉनसन राहत असलेल्या हॉटेल रूममध्ये साप सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेचा फोटो मिचेलने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर करून माहिती दिली.

  मिचेल जॉनसन कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. मिचेल सध्या लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये (Legends League Cricket) इंडिया कॅपिटल्सकडून (India Capitals) खेळत आहे. दरम्यान मिचेल राहत असलेल्या हॉटेल मधील खोलीच्या दरवाजाजवळ साप आढळला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mitchell Johnson (@mitchjohnson398)

  सापाचा फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर करून मिचेल जॉनसने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “माझ्या खोलीच्या दरवाज्याजवळ साप आढळला आहे.” तसेच हा कोणत्या प्रकारचा साप आहे? असाही प्रश्न त्याने क्रिकेट चाहत्यांना विचारलाय. मिचेलने पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.