कतारमध्ये पार पडला फिफा विश्वचषकाचा नेत्रदीपक उद्घाटन सोहळा

  २० नोव्हेंबर रोजी जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा पारपडला.
  यंदा प्रथमच कतार मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अल बयात स्टेडियमवर पारपडेल्या उदघाटन सोहळ्यात कतारमधील संस्कृतीचे दर्शन घडले.
  नेत्रदीपक सोहळ्यात फ्रान्सचा महान फुटबॉलपटू मार्केल डेसैलीने वर्ल्डकपच्या ट्रॉफी मैदानावर आणत या सोहळ्याला सुरूवात केली.
  फिफा विश्वचषक स्पर्धेचा नयनरम्य उदघाटन सोहळा इक्वाडोर आणि यजमान कतार यांच्या सामन्यापूर्वी झाला.
  या सोहळ्यात कतारच्या संस्कृतीची माहिती दिल्यानंतर संर्व संघाचे झेंडे आणि यापूर्वीची स्पर्धेची अँथम साँग्स यांची झलक देखील स्टेडियमवरील उपस्थितीत फुटबॉल चाहत्यांना दाखवण्यात आली.

  दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध बँड बीटीएस गायक जुंगकॉक याच्या कॉन्सर्टचा देखील प्रेक्षकांनी आनंद घेतला.