गुणतालिकेमध्ये चेन्नईवर टांगती तलवार, गुजरातच्या प्लेऑफच्या आशा कायम!

शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी कालच्या सामन्यात गुजरातला विजय मिळवून दिला.

    CSK विरुद्ध GT : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 59वा सामना पार पडला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. कालचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला होता. या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा गुजरात टायटन्सने 35 धावांनी पराभव केला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी कालच्या सामन्यात गुजरातला विजय मिळवून दिला. यामुळेच या विजयानंतर गुजरातने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा अबाधित ठेवल्या आहेत, तर दुसरीकडे चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता टांगणीला लागली आहे.

    गुणतालिकेची स्थिती
    गुणतालिकेचा विचार करता गुजरात टायटन्सचा संघ सध्या सातव्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यत 12 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांना ६ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे तर 6 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. गुजरातचे आतापर्यत 12 सामने झाले आहेत त्यापैकी त्यांनी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर 7 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. गुणतालिकेमध्ये टॉप – 4 संघांमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स 16-16 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर तर चेन्नई 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

    चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना
    कालच्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. कालच्या सामन्यांमध्ये शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोन्ही फलंदाजी कालच्या सामन्यांमध्ये शतक ठोकून धावांचा डोंगर उभा केला. चेन्नई सुपर किंग्सला 18 षटकामध्ये पहिला विकेट मिळाला. शुभमन आणि साई सुदर्शन यांनी 207 धावांची भागीदारी केली. गुजरात टायटन्सने चेन्नईसमोर 231 धावांचे लक्ष्य उभे केले. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचा विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये चेन्नईने 3 विकेट्स गमावले. त्यानंतर डॅरिल मिशेल आणि मोईन अली यांनी चेन्नईची फलंदाजी ट्रकवर आणत खेळ सांभाळला. परंतु त्यांना 231 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही.