MS धोनीचे मंदिर बांधले पाहिजे! चेन्नई सुपर किंग्जच्या चॅम्पियनने केली मोठी मागणी

अंबाती रायडूने मागील वर्षी आयपीएलमधून संन्यास घेतला. त्याचबरोबर तो महेंद्रसिंह धोनीचा चांगला मित्र सुद्धा आहे. काल चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना झाला. यावेळी रायडूने धोनीचे भरभरून कौतुक केले आहे.

  MS धोनी-अंबाती रायडू : आयपीएल 2024चा (IPL 2024) काल 61वा सामना पाहायला मिळाला. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेने 13 सामन्यांत सात विजय नोंदवले. एमएस धोनीने चालू हंगामातील शेवटचा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला आहे, जिथे त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

  काय म्हणाला अंबाती रायडू

  याच सामान्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज अंबाती रायडूने सांगितले की, रजनीकांत आणि खुशबू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मंदिरे चाहत्यांनी बांधली आहेत. या यादीत एमएस धोनीचा समावेश केला जाऊ शकतो, कारण त्याने भारतीय आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला असल्याचे रायडूने सांगितले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रायुडू म्हणाला, “एमएस धोनी हा चेन्नईचा देव आहे आणि मला विश्वास आहे की त्याचे मंदिर येत्या काही वर्षांत चेन्नईमध्ये बांधले जाईल.”

  रायडूने केले एमएस धोनीचे कौतुक

  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 5 आयपीएल विजेतेपद पटकावले होते. धोनीने चॅम्पियन्स लीग T20 चे विजेतेपदही दोनदा जिंकले. एमएस धोनी हा असा आहे की ज्याने दोन विश्वचषक जिंकून भारताला आनंद दिला आणि अनेक आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग विजेतेपदे जिंकून चेन्नईच्या चाहत्यांना आनंद दिला. तो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे, ज्यांनी संघ, देश आणि CSK साठी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.

  चेन्नईचा पुढील सामना

  चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत असणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघांचे प्लेऑफ मध्ये एंट्री मारण्याची लढत सुरु आहे. त्यामुळे हा सामना मनोरंजक नक्कीच होईल आणि या सामन्यांमध्ये विजय मिळवून कोणता संघ प्लेऑफचे तिकीट मिळवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.