Abhishek Porel's Impact; Turned the match in 10 balls; Delhi's challenge of 175 runs against Punjab

IPL 2024 PBKS vs DC :  शाय होप आणि अभिषेक पोरेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 174 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून अभिषेक पोरेल यानं 10 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. पंजाबला विजयासाठी 20 षटकात 175 धावांचं आव्हान आहे.

  IPL 2024 PBKS vs DC : आज दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात समतोल झाली, तरीही त्यांनी दिलेले 175 धावांचे आव्हान हे अभिषेक पोरेलच्या फलंदाजीचे योगदान आहे. शाय होप आणि अभिषेक पोरेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 174 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून अभिषेक पोरेल यानं 10 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. पंजाबला विजयासाठी 20 षटकात 175 धावांचं आव्हान आहे.

  पंजाबचा कर्णधार शिखर धवन यानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदीजी कऱण्याचा निर्णय घेतला. मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी शानदार सुरुवात केली. दोघांनी पंजाबची गोलंदाजी फोडली. पण दिल्लीने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. मिचेल मार्श 12 चेंडूमध्ये 20 धावा काढून माघारी परतला. मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 3.2 षटकात 39 धावांची भागिदारी केली. मिचेल मार्श यानं आपल्या छोटेखानी खेळीमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. मिचेल मार्शनंतर डेविड वॉर्नरही ठरावीक अंतरानंतर तंबूत परतला. वॉर्नरने 21 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
  ऋषभ पंतचं कमबॅक 
  सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर शाय होफ आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला. पंतने जवळपास दीड वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले. पंत आणि शाय होप यांनी वेगानं धावा जमवण्यास सुरुवात केली. खासकरुन होफ यानं पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शाय होप यानं 25 चेंडूत 33 धावांचं योगदान दिलं. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुखापतीनंतर पुन्हा मैदानावर कमबॅक करणाऱ्या पंतला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. पंतला फक्त 18 धावाच करता आल्या. पंतने या खेळीमध्ये दोन चौकार ठोकले.
  रिकी भुई आणि ट्रिस्टन स्टब्स यांना मोठी खेळी करता आली नाही. रिकी भुई  3 तर स्टब्स पाच धावा काढून बाद झाले. दोघांनी मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या. अक्षर पटेल याने आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. अक्षर पटेलने 13 चेंडूमध्ये 21 धावांची महत्वाची खेळी केली. यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
  पंजाबची गोलंदाजी
  अर्शदीप सिंह याने 4 षटकात 28 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. कगिसो रबाडा,हरप्रीत ब्रार, राहुल चाहर यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. हर्षल पटेल यालाही दोन विकेट मिळाल्या.
  पंजाब किंग्सचे 11 शिलेदार
  शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, ऋषी धवन/ हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
  दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात आज कोण कोण?
  पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), अक्षर पटेल, ललित यादव, कुमार कुशाग्रा/अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे.