अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानला रतन टाटा यांनी का दिले १० कोटी रुपये? जाणून घ्या सविस्तर

अफगाणिस्तानच्या विजयानंतर राशिद खानने भारताचा झेंडा फडकावल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता, त्यानंतर आयसीसीने राशिद खानला ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    रतन टाटा – राशिद खान : अलीकडेच अफगाणिस्तान क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव केला. अफगाणिस्तानच्या विजयानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. अशाच एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या विजयानंतर राशिद खानने भारताचा झेंडा फडकावल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता, त्यानंतर आयसीसीने राशिद खानला ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    रतन टाटा यांनी रशीद खानला १० कोटी रुपये दिले होते का?

    आयसीसी फायनलनंतर रतन टाटा पुढे आले. त्यांनी अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानला १० कोटी रुपये देण्याचे ठरवले, पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? वास्तविक, आता रतन टाटा यांनीच ती फेक न्यूज आहे, असे स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी कोणत्याही खेळाडूशी संबंधित कोणताही सल्ला किंवा तक्रारीबाबत आयसीसीला कोणताही सल्ला दिलेला नाही. त्याने पुढे लिहिले की, माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. मात्र, रतन टाटा यांचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत रतन टाटा यांच्या पोस्टवर कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.