अफगाणिस्तानला पराभवाचा धक्का, आशिया कप फुटबॉल स्पर्धेत भारतीय खेळाडूंशी गैरवर्तन, पाहा व्हिडिओ

टीम इंडियाचा गोलकीपर गुरप्रीत सिंग दोन्ही संघांना शांत करताना दिसतो, पण त्यालाही अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी धक्काबुक्की केली. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आपल्या सहकारी खेळाडूंना वाचवण्यासाठी गेले, मात्र हाणामारी थांबली नाही. मारहाण का झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.

  नवी दिल्ली – भारत आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे संबंध क्रिकेटमध्ये चांगले असतील, पण फुटबॉलमध्ये तसे नाही. शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या AFC एशिया कप क्वालिफायर्स-२०२२ मध्ये भारताने अफगाणिस्तानचा २-१ ने पराभव केला. या पराभवामुळे निराश झालेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंशी गैरवर्तन केले, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू दोन भारतीय खेळाडूंसोबत भांडताना दिसत आहेत.

  टीम इंडियाचा गोलकीपर गुरप्रीत सिंग दोन्ही संघांना शांत करताना दिसतो, पण त्यालाही अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी धक्काबुक्की केली. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आपल्या सहकारी खेळाडूंना वाचवण्यासाठी गेले, मात्र हाणामारी थांबली नाही. मारहाण का झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. दोन्ही संघांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही.


  छेत्रीची जादू चालली
  या सामन्यात भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने अप्रतिम गोल केला. त्याने ८५व्या मिनिटाला फ्री-किकवर गोल मारून टीम इंडियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, पण अफगाणिस्तानने ८८ मिनिटाला झुबेर अमीरीने फ्री-किकवर गोल करत सामना बरोबरीत आणला. यानंतर, साहल अब्दुल समदने केलेल्या शानदार स्ट्राईकने ९०+२ मिनिटांत सामना संपण्यापूर्वी टीम इंडियासाठी निर्णायक गोल केला.

  ड गटात टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे
  या विजयासह भारतीय संघ स्पर्धेतील ड गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. हाँगकाँगचा संघ पहिल्या स्थानावर आहे. दोघांच्या खात्यात समान ६-६ गुण आहेत. मात्र, गोल फरकाच्या बाबतीत हाँगकाँगचा संघ पुढे आहे.