ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंची सचिन तेंडुलकरने घेतली भेट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव केला. यावेळी सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. सचिनने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना फलंदाजीशी संबंधित टिप्स दिल्या.

    अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सध्या भारतामध्ये त्याचबरोबर जगभरामध्ये वर्ल्ड कप २०२३ चा क्रेझ सुरु आहे. आज विश्वचषक २०२३ चा हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. आज अफगाणिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरची भेट घेतली होती. संघातील खेळाडूंनी सचिनसोबत बराच वेळ घालवला आणि यादरम्यान क्रिकेटशी संबंधित अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.

    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव केला. यावेळी सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. सचिनने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना फलंदाजीशी संबंधित टिप्स दिल्या. संघाचे फिरकी गोलंदाज राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी खूप बोलले. नबीने सचिनला अफगाणिस्तानातून एक खास प्रकारचा केशर भेट म्हणून दिला. अफगाण बोर्डानेही त्याचा फोटो शेअर केला आहे.

    भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जडेजा विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तान संघात सामील झाला आहे. याचा फायदा संघालाही होत आहे. अफगाणिस्तानने या विश्वचषकात मोठ्या संघांवर विजय नोंदवला आहे. त्याने एक विशेष कामगिरीही केली आहे. अफगाणिस्तानचा संघ इतिहासात प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पोहोचला आहे. तो २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. अफगाणिस्तानचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत आणि ४ जिंकले आहेत. तर ३ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानला उपांत्य फेरीतील आपल्या आशा कायम राखण्यासाठी उर्वरित सामने जिंकावे लागतील. त्याचा एक सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. अफगाण संघाचे सध्या ८ गुण आहेत.