team india

आज विश्वचषकातील 10 वा सामना हा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. दरम्यान काल भारताने अफगानिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.

    मुंबई – आयसीसी वनडे वर्ल्ड कप (Cricket World Cup 2023) स्पर्धेचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. सध्या भारतात सर्वंत्र क्रिकेटमय वातावरण झालं आहे. काल भारताने अफगानिस्तानवर दणदणीत आठ विकेटनी मात केली. या सामन्यात भारताने (India) अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केली आहेत. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांने अनेक रेकॉर्ड केले आहेत. कालच्या सामन्यानंतर भारताचा पुढील सामना पाकिस्तानसोबत शनिवारी होणार आहे. तर आज विश्वचषकातील 10 वा सामना हा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. दरम्यान काल भारताने अफगानिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. (After Afghanistan’s victory, India’s big jump in the points table; What is the position of team India in the point table)

    गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानी…

    दरम्यान, कालचा सामन्यानंतर पॉंईट टेबल अपडेट झाला असून, यात भारताने मोठी झेप घेतली आहे. तर दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. कालचा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला आहे. त्यामुळं गुणतालिकेत भारत सध्या दुसऱ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. न्यूझीलंडकडे चार गुण आहेत, तर भारताकडे देखील चार गुण आहेत. तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा संघ आहे. चौथ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. आज विश्वचषकातील 10 वा सामना हा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकूण आफ्रिका संघाला अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे.

    रिझवानच्या सर्वाधिक धावा…

    दुसरीकडे आत्तापर्यंत नऊ सामने खेळण्यात आले आहेत, आज विश्वचषकातील दहावा सामना होत आहे. आत्तापर्यंत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवानने दोन सामन्यात सर्वाधिक 199 धावा काढल्या आहेत, तर गोलंदाजीत न्यूझीलंड संघाचा मिचेल स्टेनर याने दोन सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत, दुसऱ्या स्थानी भारताचा जसप्रित बुमराह आहे. त्याने दोन सामन्यात सहा विकेट घेतल्यात.