राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर कोलकाता नाईट राइडर्सने रचला इतिहास

राजस्थानच्या संघाने सलग चार सामने गमावल्यामुळे कोलकाता नाईट राइडर्सला झाला मोठा फायदा, रचला इतिहास

    कोलकाता नाईट रायडर्स : काल आयपीएल २०२४ चा (IPL 2024) ६५ वा सामना रंगला होता. गुणतालिकेमध्ये शेवटच्या स्थानावर असलेला पंजाब किंग्सचा (Panjab Kings) संघाने पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेलय राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव केला. कालचा हा सामना गुवाहाटी मधील बारसापारा क्रिकेट स्टेडियम झाला. या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा ५ विकेट्सने पराभव केला. राजस्थानच्या संघाने सलग चार सामने गमावले आहेत त्यामुळे या घटनेचा कोलकाता नाईट राइडर्सला (Kolkata Knight Riders) मोठा फायदा झाला आहे. राजस्थानच्या पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये झालेल्या पराभवामुळे कोलकाताने इतिहास रचला आहे.

    यंदाच्या सीझनमध्ये कोलकाता नाईट राइडर्सने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आता त्यांच्याकडून नंबर १ चा मुकुट कोणीही हिस्कावून घेऊ शकत नाही. आतापर्यत कोलकाता नाईट राइडर्सचे १३ सामने झाले आहेत त्यापैकी त्यांनी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाताच्या संघाने आतापर्यत आयपीएलचे २ खिताब जिंकले आहेत. यंदा पहिल्याच वर्षी आयपीएलमध्ये कोलकाताच्या संघाने पहिले स्थान पटकावले आहे. कोलकाताने या हंगामामात पहिल्या तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.

    आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स

    आजचा आयपीएल २०२४ चा ६६ वा सामना रंगणार आहे. या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Taitans) आमनेसामने असणार आहेत. या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. परंतु गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.