वर्ल्ड कप गमावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला ड्रेसिंग रूमला दिली भेट, खेळाडुंना दिली हिम्मत!

ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या रविवारी खेळला गेला. वर्ल्डकपमध्ये सलग विजयांची नोंद करणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला

  अहमदाबाद: वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) च्या फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडू आणि चाहते अजूनही या धक्क्यातून सावरलेलेल नाही. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही  (PM Narendra Modi) अहमदाबादला गेले होते. या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले. त्यांनी खेळाडूंना धिर देत प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.

  टिम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधीस व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ड्रेसिंग रूमला भेट दिली आणि टिम इंडिया खेळाडुंची भेट घेतली आणि संघातील सर्व खेळाडूंचे धैर्य वाढवताना दिसले.

  रवींद्र जडेजाने मोदींसोबतचा फोटो केला शेअर

  याआधी मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करताना लिहिले की, “टूर्नामेंट आमच्यासाठी छान होती, पण काल ​​आम्ही हरलो. आम्ही सर्व दुःखी आहोत, पण लोकांचा पाठिंबा आम्हाला हिम्मत देत आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूममध्ये आले तेव्हा ते आमच्यासाठी खास होते, ते आमच्यासाठी खूप खास आणि प्रेरणादायी होते.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोहम्मद शमीला मारली मिठी

  तर मोहम्मद शमीने ट्विट केले होते की, “दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. ड्रेसिंग रूममध्ये येऊन आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. आम्ही नक्कीच लवकरच परत येऊ.”

  ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या रविवारी खेळला गेला. वर्ल्डकपमध्ये सलग विजयांची नोंद करणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्टेडियममध्ये आले होते.