तीन सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची डोकेदुखी वाढली

कुलदीप यादवला चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. कुलदीप यादवच्या परतण्याची तारीख अद्याप ठरलेली नाही.

    दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल २०२४ च्या या सीझनमध्ये चांगल्या फॉर्म नसल्यामुळे त्याची डोकेदुखी वाढत चालली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला कंबरदुखीमुळे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. कुलदीप यादवला चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. कुलदीप यादवच्या परतण्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. त्याच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकला नाही.

    सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, कुलदीप यादवची दुखापत फारशी गंभीर नाही. तो दिल्ली संघासोबत मुंबईत आहे, ज्याचा सामना रविवारी मुंबई इंडियन्सशी होणार आहे. कुलदीप यादवलाही पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता कारण तो T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे. आगामी T20 विश्वचषकात कुलदीप यादव भारतीय संघाचा एक्स-फॅक्टर ठरेल, अशी अपेक्षा आहे. कारण चायनामनने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामने खेळले आणि एकूण तीन विकेट घेतल्या.

    ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यत चार सामने खेळले, त्यापैकी तीनमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीचा एकमेव विजय चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झाला. आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स संघ चार सामन्यांत एक विजय आणि तीन पराभवांसह 9व्या स्थानावर आहे.