पाकिस्तानशी पराभवानंतर आता Team India अडचणीत, अस्तित्व टिकवायचे असेल तर यापुढे पुढील प्रत्येक मॅच जिंकावीच लागणार

टीम इंडिया ज्या ग्रुपमध्ये आहे, त्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्थान, नामिबिया आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. नामिबिया आणि स्कॉटलंड या दोन्ही टीमना टीम इंडिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान सहज हरवू शकतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या मॅचेसमध्ये तिन्ही देशांना प्रत्येकी दोन गुण निश्चित मानले जातायेत.

    दुबई : टी २० वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानशी (Pakistan) ऐतिहासिक पराभव पत्करल्यानंतर, या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियासमोर (Team India) अडचणींचा डोंग उभा ठाकला आहे. टी-२० त अत्सित्व ठेवायचे असेल, तर यापुढील चार मॅचेस कुठवल्याही परिस्थितीत टीम इंडियाला जिंकाव्याच लागणार आहेत. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची गाठ इंग्लंडशी (England) पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत असून, सध्या इंग्लंडला टी-२०त हरवणे सर्वात अवघड मानण्यात येते आहे.

    एक जरी मॅच हरले तर अडचणीत भर

    टीम इंडिया ज्या ग्रुपमध्ये आहे, त्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्थान, नामिबिया आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. नामिबिया आणि स्कॉटलंड या दोन्ही टीमना टीम इंडिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान सहज हरवू शकतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या मॅचेसमध्ये तिन्ही देशांना प्रत्येकी दोन गुण निश्चित मानले जातायेत. या तिन्ही टीमच्या कामगिरीवर अफगाणिस्थानसोबतच्या लढतीचा निर्णय होईल, त्यामुळे अफगाणिस्थानची टीम टी-२० वर्ल्डकपमध्ये मोठा बदल घडवून आणू शकेल, अशी शक्यता आहे.

    जरी अफगाणिस्थानसोबत तिन्ही टीम्स जिंकल्या तर पाकिस्तान ८ गुणांसह टॉपवर असेल, तर टीम इंडिया आणि न्यूझीलंड प्रत्येकी सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहतील.

    न्यूझीलंडविरुद्धची लढत सर्वात महत्त्वाची

    भारताला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत न्यूझीलंडला हरवून आपले ८ गुण होतील, हे पाहावे लागेल. आणि पाकिस्ताननेही न्यूझीलंडला हरवावे, ही आशा करावी लागेल. असे झाले तरच ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहून भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करता येईल.

    जर न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तानला हरवले तर तिन्ही टीमकडे ८-८ गुण होतील, आणि त्यानंतर सेमीफायनला जाण्याची संधी रनरेटवर ठरेल, अशा वेळी कोणतीही टीम यात बाजी मारु शकेल.

    दुसऱ्या क्रमांकावर राहिलो तर सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी मुकाबला

    गेल्या काही काळात टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडची टीम चांगलीच फार्मात आहे. या आधारावर दुसऱ्या ग्रपुमधील सर्व मॅचेस जिंकून इंग्लंडची टीम पहिल्या क्रमांकावर राहील, असे मानण्यात येते आहे. यात जर टीम इंडिया आप्लया ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रहिली तर सेमीफायनलला भारत आणि इंग्लंड आमनेसामने असतील. अशा स्थितीत फायनल गाठणे हे मोठे आव्हान असेल. जर असे झाले नाही तर सेमीफायनलमध्य़े टीम इंडियाची गाठ ऑस्ट्रेलिया, श्रीलंका किंवा द. अफ्रिकेशी पडेल. या टीमसोबत मॅच जिंकणे तुलनेने सोपे मानावे लागेल.