वर्ल्ड कपमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री केली भारताच्या खेळाडूंवर टीका, नेटकऱ्यांनी चांगलचं धुतलं

सहर शिनवारी हिने तिच्या ट्विर पेजवर लिहिले आहे की, भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणात टीव्ही फुटले असतील असे तिनं म्हटले आहे. यावर तिलाही नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.

    पाकिस्तानी अभिनेत्रीची भारतावर टीका : काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अंतिम सामना पार पडला. भारताच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर आता सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. जो तो आता त्यांची मते सोशल मीडियावर मांडत आहेत. त्यामध्ये अनेक सोशल मीडिया सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातचं पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारीच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सहर शिनवारीनं भारताचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा बोचक प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांचा राग मस्तकावर आला आहे.

    सहर शिनवारी हिने तिच्या ट्विर पेजवर लिहिले आहे की, भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणात टीव्ही फुटले असतील असे तिनं म्हटले आहे. यावर तिलाही नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. त्याचीही चर्चा होत आहे. सहर शिनवारी हिला रिप्लाय देत एका युझर्सनं म्हटले आहे की, आम्ही तुमच्या देशातील लोकांप्रमाणे वागत नाही. कसे वागावे हे आम्हाला कळते. तेव्हा भारतातील चाहत्यांची तुलना ही पाकिस्तानी चाहत्यांशी करु नका. दुसऱ्यानं म्हटले आहे की, आम्ही हारल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसारखे वागत नाही. तुम्ही मात्र तसे करता आणि आमची तुलना तुमच्यासोबत करु लागता. तिसऱ्यानं लिहिलं आहे की, किमान आमच्याकडे फोडण्यासाठी टीव्ही तरी आहेत तुमच्याकडे तर तेही नाहीत.

    कोण आहे सहर शिनवारी?
    सहर ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आणि टिकटॉक स्टार आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची, नेटकऱ्यांची संख्या मोठी आहे. पाकिस्तामध्ये ती भलतीच प्रसिद्ध आहे. सहर ही २०२२ मध्ये चर्चेत आली होती. त्यावेळी टी २० वर्ल्ड कप दरम्यान काही वक्तव्यं केली होती. जर इंडिया हरली तर आपण झिम्बॉवेच्या मुलासोबत लग्न करणार असं ती म्हणाली होती. सहर ही चर्चेतील अभिनेत्री आहे. तिनं शेर सवा शेर नावाच्या एका कॉमेडी सीरिअलमध्ये काम केले आहे. आता ती तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत येणारी सेलिब्रेटी आहे. ज्यावेळी पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला तेव्हा तिनं बाबर आझमसह बाकीच्या खेळाडूंचा राजीनामा मागितला होता. त्यावरुन मोठा वादही झाला होता.