…..अन् चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका, काल मॅच संपल्यानंतर माहीने असे सांगितले, की त्यामुळे चाहते झाले हवालदिल, पाहा नेमके काय घडले

देशातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनीचे नाव घेतले जाते. माहीने त्याच्या कारकिर्दीत भारताला दोन विश्वकप मिळवून दिले. माहीचे टीम इंडियातील खेळाडूंबरोबर बॉंडिंगसुद्धा जबरदस्त आहे. माहीचे फॅन फॉलोअर्ससुद्धा खूप मोठा आहे. माहीने त्याच्या कारकिर्दीत उत्तमोत्तम सामने जिंकत टीम इंडियाला एक आघाडीचा संघ करून ठेवले. आज त्याच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चांनी त्याचा चाहता वर्ग कमालीचा नाराज आणि हवालदिल झाला आहे. २१ एपिलला त्याने चेन्नईतसुद्धा हा माझा शेवटचा हंगाम असणार आहे, असे बोलून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तेच त्याने पुन्हा एकदा कोलकाताच्या ईडन गार्डनवर बोलल्याने आज चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. पाहा नेमके धोनी काय म्हणाला.......

    कोलकाता : शहर बदलले, चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिस्पर्धी बदलले, पण एमएस धोनीचा सूर मात्र बदलला नाही. २३ एप्रिलच्या संध्याकाळी, कोलकात्यात निवृत्ती संदर्भात जे बोलला तेच २१ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये बोलले होता. ‘ईडन गार्डन्सच्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. ते सर्वजण मला निरोप द्यायला आले होते.’… हे शब्द होते महेंद्रसिंग धोनीचे आयपीएलच्या १६व्या मोसमात काल रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतर. कोलकात्यातील हे ऐतिहासिक मैदान त्याच्या स्थानिक संघ कोलकाता आणि महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा देण्यासाठी खचाखच भरले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने या मैदानावर सर्वात मोठी टी२० धावसंख्या म्हणजेच २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ आठ गडी गमावून १८८ धावांवर गडगडला आणि विजयापासून ४९ धावा दूर राहिला.

    सामना संपल्यानंतर मैदानावर पोहोचलेले चाहते पुरस्कार सोहळ्यात धोनीचा आवाज ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबले. माहीने चाहत्यांचे आभार मानले आणि हातवारे करत सांगितले की, “आता एक खेळाडू म्हणून तो या मैदानावर पुढचा सामना खेळू शकणार नाही अर्थात त्याची आयपीएल निवृत्ती लवकरच होणार आहे. आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वीच अनेक दिग्गजांना विश्वास होता की धोनीची ही शेवटची आयपीएल असेल. आता खुद्द धोनीनेही हा त्याचा शेवटचा हंगाम असल्याचे मान्य केले आहे. केकेआरच्या सामन्यानंतर धोनी म्हणाला की, ‘कोलकाताचे प्रेक्षक मला फेअरवेल देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याबद्दल त्यांचे आभार.’